Raj Thackeray | सुरक्षेच्या कारणास्तव मनसेचं केंद्राला पत्र| Sakal Media
मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आणि १ मे च्या औरंगाबादेतील सभेच्या तयारीविषयी चर्चा करण्यासाठी मुंबईतील शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाच्या आगामी कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी अक्षय्य तृतीयेला मनसे कार्यकर्ते परवानगी घेऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकरांनी सांगितलं. राज ठाकरेंना केंद्र सरकरकडून अतिरिक्त सुरक्षा पुरवली जाण्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या बाबतीत आपण राज्याच्या गृहमंत्र्याना आम्ही पत्र लिहिलं आहे, असंही नांदगावकरांनी सांगितलं.